सोमवार, 2 सितंबर 2013

कहानी विधा के एक प्रखर समकालीन नाम साथी कैलाश वानखेड़े जी के सलाह पर प्रतिष्ठित मराठी कवि प्रसेनजीत गायकवाड़ की मराठी कविताएँ और फिर उनका अंग्रेजी अनुवाद …

1. कवितेच्या गर्भातून

वेदनेला अर्थवाया
शब्द शब्द गोळा केला
एका एका अक्षरासी
तप तप दिस गेला

युगे युगे धुंडाळली
तेव्हा आली एक ओळ
जरा जरा टिचू लागे
दु:ख कल्पांताची खोळ

ओळ ओळ जुळू लागे
देही मनी उठे कळ
झळ लागे रोमरोमी
प्राणातून सळसळ

वेदनांच्या ओझ्याखाली
एका क्षणी निर्वाणलो
कवितेच्या गर्भातून
आणि पुन्हा जन्मा आलो

अंग्रेजी अनुवाद 

From the Embryo of poetry

Gave meaning to anguishes
accumulated each of the word
for every alphabet
a day became years of duodecimal 

Ages to seek
a line emerges
Pullulates bit of stratum 
of deep struck grief

line adds to line
corpus nous crop up contrivance
pilus n pore showers
delight from soul

under the encumbrance of anguishes
in a moment of emancipation
from the embryo of poetry
it is my rebirth

Embryo - womb
Duodecimal - term used for twelve.
Pullulates -  cracks
Corpus - body
Nous - mind

0000

2. माणूस मी...

तुझ्यासवे सुखी
असो तुझा देव
उगा मला भेव, ... दावू नको

तुझिया देवाला
दिला मी आकार
भाग्याचा प्रभार, ... सोपवला

माझ्या मुठीमध्ये
उन, वारा, जल
पाषाणचे बल, ... पायदळी

करीन अव्हाटी
सागरा, पर्वता
आखीन मी रस्ता, ... उन्नतीचा

अदम्य, दुर्दम्य
माझी इच्छाशक्ती
बुध्दी आणि युक्ती,... माणूस मी

अंग्रेजी अनुवाद 

I'm Human

Be blessed 
with your god
your fear of fraud
doesn't bothers me

I shaped 
your God
and handed him
charges of destiny

My fist contains
Warmth, Air, Water
Power of centuries 
are beneath my feet

Will challenge 
Oceans and Mountains
pave up ways
for the progress

Unconquerable, redoubtable 
is my conation
wisdom and device
Human I am  

0000

3. झाडांनी...

वावटळींच्या भूलथापांना
बळी पडू नये झाडांनी,
घासून घेऊ नये फांद्या परस्परांवर,
कारण नसताना उडवू नये ठिणग्या,
वणव्यांना देऊ नये निमंत्रण...

झाडांनी जंगलाचे भान ठेवावे.
जीवनरस पुरवणाऱ्या मुळांकडे लक्ष द्यावे.

मुळे...
हातात हात घालून फुगडत असतात.
झाडांच्या आयुष्यासाठी
खडकाशी झगडत असतात.

झाडांनी आत्ममग्न होऊन क्षणभर
आपला आघार घट्ट करून घ्यावा.
वावटळींच्या भूलथापांना फाटा द्यावा.

अंग्रेजी अनुवाद 

Trees should ...

To the rumours of whirlwinds
trees should not succumb,
should restrict branches from mutual abrasiveness
without reason should not flow sparks
should not invite forest fire...

Trees must have regards for forest
should give attention towards roots
as they are supplier of zest of life

Roots...
tie hand in hand to exalt
for long life of trees 
fighting underground stones

Trees should recollect themselves for moment
to strengthen their foundation
to ignore the rumours of whirlwinds 

0000

4. दंगल पसरत जाते...

दंगलीला नसतात हात किंवा पाय;
तरीही ती पसरत जाते... अस्ताव्यस्त...
पाण्यावर तेलाचा तवंग पसरावा तशी 
दंगल अफवेवर असते स्वार...

दंगल छापवून आणते वृत्तपत्रांत
स्तंभच्यास्तंभ, रकानेच्यारकाने आणि मुखपृष्ठकथा.
तिच्याच सहकार्याने प्रेक्षणीय होतात
दूरचित्रवाहिन्यांच्या सनसनाटी वृत्तमालिका.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा
टीआरपी दंगलच उंचावते.
दंगल नसते दडून
कोण्या पडक्या भिंतीच्या कुबट कोपऱ्यात.
डांबराच्या रिकाम्या पिंपातही असत नाही दंगल.
उंच डोंगराच्या मागे किंवा खोल विहिरीच्या तळाशी 
दंगल लपून बसत नाहीच कघी.
दंगल हळूच डोकावते
दगडाला लेपलेल्या षेंदराच्या भगव्या खोळीतून.
जुनाट वृध्द वृक्षाखाली
भेगाळलेल्या थडग्यावरील फाटक्या हिरव्या चादरीआड
सजग पडून असते दंगल.
काटेरी मुकुटात स्वत:ला गुंतवून
दंगल उडवत असते
वेदनेने विव्हळणाऱ्या येशूची खिल्ली.
कधी कधी बाबासाहेबांच्या दिशादर्शक बोटावरून
बुध्दाच्या पंचशीलाला चिडवत असते दंगल.

दंगल
पंचतारांकित उंच इमारतींच्या वातानुकुलित कमऱ्यातून
शहराच्या हमरस्त्यावर, चौकाचौकावर डोळा ठेवून असते.
झोपडपट्टयांवरही असते तिची मेहरनजर.
दंगलीचेच सण साजरे करतात सरकारी बंदुका.
पोलिसांना लावता येते संचारबंदी
आणि काढून घेता येते
वरीष्ठांनी घातलेल्या शिव्यांची खुन्नस
दंगलीचे निमित्त करून.

दंगलीच्या आशीर्वादाने
श्रीमंतांना शॉपिंगच्या रगाडयातून काढता येते जराशी उसंत,
गरीबांच्या चुलींना मिळते हक्काची विश्रांती.

केवळ दंगलीमुळेच मिळते विचारवंतांच्या मेंदूंना खाद्य...
विशलेषणे आणि चर्चांना येतो उत
पावसाळी कुत्र्यांच्या मुताप्रमाणे...

मेंदूची माती आणि काळजाचा कोळसा झालेले कॅमरामन
दंगल करतात चित्रबध्द;
तरीही सापडत नाही कुणालाच तिचा पत्ता.
दंगल पसरत जाते अस्ताव्यस्त...

अंग्रेजी अनुवाद 

Riot spreads on

Riot has no hands nor legs
then also it spreads... scattered ...
like oily conceit spreads on water
riots rides on rumours...

Riot gets printed in Newspapers
in coloumns to coloumns, pages to pages and as cover stories.
with its assistance televisions sensational serials become spectacular.
The TRP of fourth coloumn of democracy rises due to riots.

Riot never evanesces
in darken side of the fallen wall
nor it remains in the empty drum of an asphalt
riots never hide in back of high mountains or in deep bottom of well

Riot slowly raises its head
from saffron room of vermilion coated stone.
In the broken grave 
under the shade of an ancient old tree
riot lives on alert under the torn green sheet.
Entangled in thorny crown 
riot makes fun of whelming Jesus Christ.
Sometimes by guiding finger of Babasaheb
riot annoy the panchsheel of Buddha.

Riot
from air-conditioner rooms of five starred heightened buildings
watches every road and square of the city
on slums it is extra compassionate.

Official guns celebrate festivals of riot
police is free to impose curfew
and can take revenge of every assaults of their seniors on the occasion of riot.

Due to blessings of riot
wealthy people can take somewhat leisure from shopping rushes
hearth of indigents gets deserving interval.

Riot fertilizes brains of intellectuals
alike fungus  
analysis and discussions get emphasized   

Cameramen whose brain turned into mud and heart into coal make films of riot;
but then nobody could trace its address
riot spreads on Helter-Skelter ...    

0000

5. तोबा तोबा...

मनुष्यतेवर बसलेला मळ... तोबा तोबा...
उरात माझ्या उठलेली कळ... तोबा तोबा...

असे दुखाने आयुष्याला छळले होते
सुखात सावघ वावरतो पळ... तोबा तोबा...

अबीर-बुक्का दळून झाले झिजले जाते
तरी कळे ना तत्त्वांचा तळ... तोबा तोबा...

नकार तुमचे झेलत आलो, पेलत आलो
रुकार वाटे एक नवा गळ... तोबा तोबा...

कषास सूर्या गमजा करषी ग्रिष्मामध्ये
तुला न ठावी जातीची झळ... तोबा तोबा...

तहान व्याकुळ काठावरती तिष्ठत आहे
हताष वेडा बसलेला हळ... तोबा तोबा...

अरे! समुद्रा, आवर लाटा गर्वोन्नत ह्या
अथांग येथे पोटाची खळ... तोबा तोबा...

अंग्रेजी अनुवाद 

I swear

Seeing sludge seated on humanity
device takes shape in me ... I swear ...

Ages passed in deception in name of grief
exploit every moment of delight with prudence ... I swear ...

Applied enough of Abir-Buka* and frayed 
then also cannot sense basis of abstract ... I swear ...

Your negation made me suffer and drive in
acceptance seems as fishing rod ... I swear ...

In summer O sun your pride is inoperable
you don't know the heat of caste ... I swear ...

Descendent Nympholept is erected manger 
Thirsty anxious waiting on brink ... I swear ...

Hey! ocean control your proud tides there 
here valley in stomach is abysmal ... I swear ...

0000

6. भुललो आपण

पुचाट अपुले सपाट मेंदू
हृदयाचाही झाला चोथा
श्ुललो आपण कोण बुध्द तो,
कोण कोठला तुकया होता?

कुणी वेचले प्राण क्रुसावर?
कुणी प्राषिला विषघर प्याला?
विष्वमंडळी सत्यासाठी
कुणी त्यागिले मायभूमीला?

समग्र सत्ता सत्य आपले,
माणिक, मोती, सुवर्ण, पैसा.
कसा स्मरावा महावीर नि
सखा आपला कबीर कैसा?

अमुचे अपुले जंती जीवन;
खाणे, व्याणे मरून जाणे.
हवेत आणि पसरून करतल
दे दे दे दे करीत राहणे...

अंग्रेजी अनुवाद 

Memory Loss

Contracitive are our flush brain
heart also squeezed
we have forgotten who Buddha was
who where from was Tukya*?

Who was crucified?
Who drank poison hemlock?
For universal truth
who left his motherland?

Ruby, pearl, gold, money
overall authority is truth for us
How to remember Mahavir
and make friendship with Kabir?

Our own wormy life
eat, breed and to die 
needs so stretch hand
and start begging

*Sant Tukaram (17th Century Marathi poet who deeply and widely influenced marathi literary culture.) 

0000

All the Poems Translated by P. Falgun from Marathi.

0000

कवि प्रसेनजीत से संपर्क : मोबाइल - 08806560740
email - prasengaikwad@gmail.com

नाव, नाविक और समुद्र

समग्र चैतन्य - पुष्पेन्द्र फाल्गुन मित्र ने कहा, ‘समंदर कितना भी ताकतवर हो, बिना छेद की नाव को नहीं डुबो सकता है.’ तो मैंने एक क...